नागपूर आणि अवतीभवतीचा परिसर रसाळ संत्रींसाठी प्रसिद्ध असून इथल्या संत्र्याना देशातच नाही तर जगात ही मागणी असते. मात्र यंदा संत्र्याच्या आंबिया बहार वर एकानंतर एक तिहेरी संकट आल्यामुळे 70 टक्के संत्र्याचा पीक नष्ट झाला आहे किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा जाणकारांचा दावा आहे. त्यामुळे यंदा एक तर संत्री खायला मिळणारच नाही... किंवा त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे... दरम्यान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर असे संकट कोसळले असताना कृषी विभाग किंवा शासनाच्या संशोधन संस्था निष्क्रिय असल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहे....